सर्वांगीण विकासासाठी नगर परिषद कटिबद्ध – नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई धर्माधिकारी
परळी वैजनाथ | प्रतिनिधी
परळी शहरातील विविध विकास कामांमध्ये आणखी चालना देणारे एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे.राज्याच्या पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे आणि माजी मंत्री आ.धनंजय मुंडे यांच्या पाठपुराव्यामुळे .जिल्हा वार्षिक योजना 2025- 26 अंतर्गत मंजूर गणेशपार विभागातील नागरी रुग्णालय परिसरातील संत गाडगेबाबा सामाजिक मंदिर संरक्षण भिंत व सुशोभिकरण कामाचा शुभारंभ आज नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांच्याहस्ते उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

संत गाडगेबाबा सामाजिक मंदिरमुळे राजपूत रजक समाजाच्या वतीने समाधान व्यक्त करण्यात आले असून नगर परिषदेकडून सुरू असलेल्या सातत्यपूर्ण विकासकामांमुळे नागरिकांचा विश्वास अधिक दृढ होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.या कामासाठी जिल्हा वार्षिक योजना 2025-26 अंतर्गत ₹23 लाख 12 हजार 841 इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे.

यामुळे परिसराचे सुशोभीकरण होऊन नागरिकांना अधिक सुरक्षित व स्वच्छ वातावरण उपलब्ध होणार आहे. तसेच सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांसाठी या ठिकाणाचे महत्त्व अधिक वाढणार आहे. संत गाडगेबाबा सामाजिक मंदिर संरक्षण भिंत व सुशोभिकरण कामाचा शुभारंभ आज नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांच्या हस्ते कामाचा शुभारंभ करण्यात आला.परळी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नगर परिषद कटिबद्ध असून नागरिकांच्या गरजांनुसार अशा विकासकामांना प्राधान्य दिले जात आहे.

परळीकर जनतेसाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न नगर परिषदेचा आहे. लोकाभिमुख कामे व जनतेप्रती समर्पित कार्य करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन नगराध्यक्षा सौ.पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांनी यावेळी केले.

या कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, बांधकाम सभापती प्रा. पवन मुंडे, महिला व बालकल्याण सभापती अंजली माळी, रविंद्र गित्ते, नितीन रोडे, केशव नागरगोजे यांच्यासह अनेक मान्यवर आणि नगर परिषदेच्या बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

