अंबाजोगाई ( प्रतिनिधी)
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत धानोरा खुर्द तालुका अंबाजोगाई या ग्रामपंचायतीची तालुकास्तरीय तपासणी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या तपासणीदरम्यान ग्रामपंचायतीच्या विविध विकासकामांची तसेच गावातील मूलभूत सुविधांची पाहणी करण्यात आली.

तपासणी पथकाने गावातील स्वच्छता, पाणीपुरवठा व्यवस्था, सांडपाणी व्यवस्थापन, नाली स्वच्छता, हरित उपक्रम, सार्वजनिक सुविधा, परसबाग,व्यायाम शाळा, जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी, उर्दू शाळा,शौचालय, समशानभूमी आधी ग्रामविकास योजनांची पाहणी अक्कलकोट येथून आलेले गटविकास अधिकारी यांच्या टीमने केली.
तपासणीसाठी गटविकास अधिकारी पंचायत समिती अक्कलकोट श्री कवित्के,’ विस्तार अधिकारी श्री. माने,श्रीपाटील, श्री. पोतदार या पथकाने धानोरा खुर्द गावाचे तालुकास्तरीय तपासणी केली.
तपासणी कामी ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचे तालुका अध्यक्ष नितीन धुमाळ सचिव शौलेश शिंदे कृषी अधिकारी प्रवीण मोरे, गडदे, ग्रामपंचायत अधिकारी श्री निकम, मेंगले , सुनील मामडगे , प्रमोद जोगदंड, सरपंच पार्वतीबाई पोळ,सहाय्यक कृषी अधिकारी पंडित काकडे, सूर्यकांत धायगुडे, शिपाई असलम सय्यद,जमालुद्दीन सय्यद, माऊली वाघमारे यांनी सहकार्य केले.
यावेळी ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामसेवक, पंचायत समिती अधिकारी तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावाच्या विकासासाठी ग्रामस्थांनी दिलेल्या सहकार्याचेही अधिकाऱ्यांनी विशेष कौतुक केले.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानामुळे ग्रामीण भागातील विकासकामांना गती मिळत असून गावांच्या सर्वांगीण विकासासाठी हे अभियान महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

