■ समाजाच्या न्याय हक्कासाठी तळमळीने काम करणारे आदिवासी समाजातील उमदे नेतृत्व – बळीराजे वाघमारे
■ विद्यार्थी दशेपासूनच राजकीय सुरुवात, कोळी राष्ट्रसंघाच्या महाराष्ट्र अध्यक्ष पर्यंत मजल
■ सामान्य कुटुंबातून उत्तुंग भरारी
(जन्मदिन विशेष लेख )
बीड-(लोकनामा खास रिपोर्ट)- जन्म कुठल्या जातीत कुठल्या कुटुंबात घ्यावा हे आपल्या हाती जरी नसले तरी आपण ज्या कुटुंबात जन्माला ज्या समाजात आपण जन्म झाला त्या समाजामध्ये आपण समाज हितासाठी कार्य करणे हे कर्तव्य आहे. अशी असली तरी सध्याच्या काळामध्ये आपले कुटुंब आणि आपण याच गोष्टीकडे समाजाची वाटचाल आहे. शेजारी उपाशी राहिला काय झोपला काय आजारी असला काय याचा विचार आजच्या युगामध्ये समाजातील नगण्य लोक मदत करतात.अशा समाज व्यवस्थेमध्ये सर्वसामान्य कुटुंबातील आदिवासी समाजातील एक उमदे नेतृत्व बळीराजे वाघमारे या नावाचे उदयास आले आहे.

आई-वडिलांनी मोलमजुरी करून बळीराजे स वाढवले कुटुंबातील गरिबीचा अथवा परिस्थितीचे भांडवल न करता आपले समाजातील तरुण पुढे यावेत त्यांच्या हाताला काही काम लागावे यासाठी सतत प्रयत्नशील असणारा हा तरुण अंबाजोगाई सारख्या ठिकाणी पुणे येथील कंपनीच्या अधिकाऱ्यांना बोलवून बीड जिल्ह्यातील तरुणांना रोजगार देण्याचा प्रमाणिक प्रयत्न बळीराजे वाघमारे करतो. विद्यार्थी दशकापासूनच समाजकारणाची आणि राजकारणाची आवड असलेला हा तरुण आहे. बीड शहरामध्ये कॉलेजच्या जीवनामध्ये विद्यार्थ्यांना मदत करण्यापासून ते महाराष्ट्रातील आदिवासी कोळी महादेव मल्हार कोळी इतर जमातींना सोबत घेऊन त्यांचे प्रश्न आंदोलन, उपोषण करुन तळमळीने सोडवण्याचा प्रयत्न मनापासून करतात. कोकणामध्ये तोक्ते वादळामुळे खूप मोठे नुकसान झाले होते. कोळी राष्ट्रसंघाच्या माध्यमातून बळीराजे वाघमारे यांनी संकटात सापडलेल्या आदिवासी कोळी समाज बांधवांना मदत नाही पण कर्तव्य समजुन अन्न धान्य किट वाटप, पत्रे, शितपेट्या वाटप करण्याचे काम मोठ्या हिमतीने केले. आदिवासी कोळी समाज बांधवांना जमातीचे प्रमाणपत्र सुलभ रीतीने मिळत नाही. आदिवासी कोळी महादेव जमातीचे प्रमाणपत्र सुलभ रीतीने मिळावे यासाठी आंदोलनात सक्रिय सहभाग घेऊन समाज बांधवांना न्याय देण्याचा प्रयत्न करणारा हा एक उमदा तरुण समाजाला मिळाला आहे. गेल्या पंधरा वर्षापासून बळीराजे वाघमारे समाज हिताचे काम करत आहेत रक्तदान शिबिर घेणे तसेच आरोग्य शिबिर घेणे तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणे हे काम करत आहेत. आदिवासी कोळी महादेव आणि इतर जमातीला न्याय मिळवून देण्यासाठी कोळी राष्ट्र संघाच्या माध्यमातून आंदोलन उभा करून न्याय देण्याचे काम बळीराजे वाघमारे यांच्याकडून होत आहे. महाराष्ट्रभरात खेड्यापाड्यातून शहरातीलआदिवासी कोळी समाज बांधव एकत्र करत समाजासाठी मोठा लढा उभा करण्याचे काम केले आहे. बळीराजे वाघमारे यांचा जन्म :- ०६ एप्रिल १९९१ साली आपेगांव ता. आंबाजोगाई जि. बीड या लहान खेड्यात आदिवासी कोळी महादेव जातीत जन्म झाला,

ना घरी अमाप संपत्ती ना घरात कोणता राजकीय वारसा आई – वडिल यांनी लोकांच्या शेतात मोल मजुरी करून वाढवले.
बळीराजा वाघमारे यांची वाटचाल अशी राहिली आहे.
राजकीय सुरुवात :- वयाच्या सतराव्या वर्षी आखील भारतीय छावा स्व. आण्णासाहेब जावळे पाटील यांच्या संघटनेमध्ये बळीराजे यांनी मा. शैलेश भैय्या जाधव यांना राजकीय गुरू माणुन, नेतृत्वाखाली २००९ साली संघटनेत प्रवेश केला व शासकीय आय. टी. आय कॉलेज बीड येथे अ. भा. छावा विद्यार्थी आघाडी या पॅनल मार्फत कॉलेजचा यु. आर झाले बीड जिल्हा अ. भा छावा विद्यार्थी आघाडी शहराध्यक्ष या पदावर काम केले. मा. तानाजी भैय्या देशमुख तालुका अध्यक्ष असताना आंबाजोगाई ता. उपाध्यक्ष पदावर काम केले २०११ मध्ये बीड जिल्हा कार्याध्यक्ष, २०१२ मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे बीड जिल्हा उपाध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष या पदावर काम केले २०१५ मध्ये शिवक्रांती युवा परिषद चे संस्थापक अध्यक्ष मा. गणेश दादा बजगुडे पाटील यांच्या विचारांना प्रेरीत होऊन मनसे सह शिवक्रांती विद्यार्थी परिषद महाराष्ट्र कार्याध्यक्ष या पदावर काम केले. २०१९ मध्ये बळीराजे यांनी कोळी राष्ट्रसंघ संघटना उभी केली. संस्थापक अध्यक्ष मा. गोकुळ दादा कोळी यांच्या सोबत महाराष्ट्र अध्यक्ष या पदावर आजही कार्यरत आहेत गोरगरीब जनतेला, विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कायम कटिबद्ध असुन समाजाचे आपण काही देणे लागतो हा मंत्र बळीराजे मनात रुजवुन समाजाशी एकनिष्ठ राहून सामाजीक कार्यात दिवसातील २४ तास ही कार्य चालुच आहे. तु लढत रहा मी तुझ्या पाठीशी आहे आहे अशी भक्कम साथ देणारे म्हणजे बळीराजें चे दाजी प्रथमेश प्रॉपर्टीज अॅण्ड डेव्हलपर्स चे मालक मा. प्रकाश शेठ सोनवणे आणि बंधु महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष मा. शैलेश भैय्या जाधव यांची आहे.

