■ स्मारक समितीकडून महात्मा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती उत्सव ; त्यानिमित्ताने विविध स्पर्धांचे आयोजन

■ स्मारक समितीचे अध्यक्ष डॉ.राजेश इंगोले यांची माहिती
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
येथील महात्मा ज्योतिराव फुले स्मारक समिती अंबाजोगाई यांच्या वतीने रविवार, दिनांक 12 एप्रिल 2026 रोजी महात्मा ज्योतिराव फुले व संविधान निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त प्रबोधनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला. या जयंती उत्सावानिमित्त महात्मा फुले स्मारक स्थळावर शालेय विद्यार्थ्यांसाठी, महाविद्यालयीन तरूणांसाठी तसेच महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले आहे अशी माहिती महात्मा फुले स्मारक समितीचे अध्यक्ष डॉ.राजेश इंगोले यांनी एका प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे दिली आहे.

या संयुक्त जयंती विशेष स्पर्धा महोत्सव 2026 खालील प्रमाणे होणार आयोजित करण्यात आल्याची माहिती स्पर्धेचे समन्वयक प्रा.मिलिंद ढगे व सचिव रत्नदीप गोरे यांनी दिली आहे. स्पर्धेचे ठिकाण – महात्मा फुले स्मारक समिती महात्मा फुले स्मारक रोड, एल.आय.सी ऑफिसच्या जवळ, अंबाजोगाई (जिल्हा बीड) स्पर्धेचे वयोगट पुढीलप्रमाणे आहेत. बालगट (इयत्ता 1ली ते 4 थी) – रंगभरण स्पर्धा दिनांक 8 एप्रिल 2026 रोजी वेळ सायंकाळी 6 ते 7 वाजता. सहभागी स्पर्धकांना महापुरूषांचे चित्र दिले जाईल चित्रात आकर्षक रंग भरायचे आहेत. स्पर्धकांनी रंग स्वतः घेऊन यावेत. आयोजकांकडून फक्त ड्रॉइंग पेपर दिला जाईल. सामान्यज्ञान स्पर्धा – गट 1 (इयत्ता 5 वी ते 8 वी), विषय – जीवनचरित्र, दिनांक 8 एप्रिल 2026 रोजी वेळ दुपारी 2 ते 3 वाजता. गट 2 (इयत्ता 9 वी ते 12 वी) विषय – सामाजिक व शैक्षणिक कार्य, दिनांक 8 एप्रिल 2026 रोजी वेळ दुपारी 3 ते 4, खुला गट (पालक, माता, गृहिणी, व्यावसायिक व 19 वर्षांवरील) विषय – डॉ.बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांचे राष्ट्र उभारणीत योगदान, दिनांक 8 एप्रिल 2026 रोजी वेळ सायंकाळी 6 ते 7, महिलांसाठी विशेष स्पर्धा ठेवण्यात आल्या आहेत. ज्यात रांगोळी स्पर्धा, विषय – महात्मा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक कार्याचे रांगोळी रूपात सादरीकरण, दिनांक 12 एप्रिल 2026 रोजी वेळ सकाळी 8 ते 9 वाजता. सदरील स्पर्धेचे वैशिष्ट्ये – समाजप्रबोधनाचा संदेश,
सर्जनशीलतेला प्रोत्साहन, सर्व वयोगटांसाठी संधी उपलब्ध करून देणे. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील. विजेत्यांस सन्मानचिन्ह व तसेच आकर्षक बक्षिसे देण्यात येतील. प्रत्येक स्पर्धकाला सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल. या स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी संपर्क – 9850189237 / 8275486643 या मोबाईल क्रमांकांवर संपर्क साधावा असे आवाहन महात्मा फुले स्मारक समितीचे अध्यक्ष डॉ.राजेश इंगोले, सचिव रत्नादीप गोरे, उपाध्यक्ष अनिल नरसिंगे, कोषाध्यक्ष संजय साळवे, सुनील नरसिंगे, हेमंत धानोरकर, प्रा.आदित्य कदम, विजय कचरे, रामेश्वर खाडे, भाऊराव गवळी यांनी केले आहे.

