Oʻअंबाजोगाई प्रतिनिधी
अंबाजोगाई तालुक्यातील धानोरा खुर्द येथे जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेतील आणि अंगणवाडी तील विद्यार्थ्यांनी वार्षिक स्नेहसंमेलनात उत्कृष्ट नृत्य सादर आपले कलागुण दाखवले होते तसेच शाळेत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेत सहभाग घेऊन बक्षीस जिंकले. या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण सोमवार रोजी करून गुणगौरव करण्यात आला.

जिल्हा परिषद मराठी शाळेत विद्यार्थ्यांनी अंगणवाडीतील चिमुकल्यांनी वार्षिक स्नेहसंमेलनात उत्कृष्ट नृत्य सादर केलेल्या आणि जानेवारी महिन्यात खेळाच्या स्पर्धा आणि निबंध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. प्रथम दुतीय तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी सरपंच पार्वतीबाई पोळ, उपसरपंच बालासाहेब गुणाले,माजी सरपंच सुरेश जगताप, रसूल सय्यद , दिलीपराव ढगे, केशव नाना ढगे ,रज्जाक पटेल, श्री किशन गोगावकर , श्रीराम जगताप , ओम पुरी, शब्बीर सय्यद , संदीप साबळे, गणी पठाण,मुख्याध्यापक सूर्यकांत धायगुडे, कचरू रंजवे, उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिका अंजुम शेख, कौशल्याबाई ढगे,अश्विनी ढगे,शांताबाई सुरवसे, अश्विनी गायसमुद्रे यांच्यासह बहुसंख्य पालक उपस्थिती होते.

