संभाजीनगर – पार्टीत दारू पाजून त्यांचे अपहरण करून त्यांच्या डोक्यात पिस्तुलाने गोळी घालून खून केल्याची कबुली दिली. लोंढे नामक व्यक्तींचा खून केल्यानंतर त्यांचे प्रेत गेवराई तांडा येथील जंगलात पुरले असल्याची घटना पोलिसांनी उघडकीस आणली असून या प्रकरणी 3 संशयित आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिल्याने संभाजीनगर सह महाराष्ट्रात चांगलीच खळबळ उडाली आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये ५० लाखांच्या आर्थिक वादातून निवृत्त प्राध्यापक राजाभाऊ लोंढे यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली. रील स्टार विशाल राठोड आणि साथीदारांनी ४० दिवसांपूर्वी खून करून मृतदेह गेवराई भागात पुरला होता, जो पोलिसांनी आता शोधून काढला आहे. या प्रकरणी संशयित म्हणून तिघांना अटक करण्यात आली असून ‘दृश्यम’ स्टाईलने हा खून लपवला होता.असे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.
संभाजीनगर येथील प्राध्यापक राजाभाऊ सुभराव लोंढे (शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे निवृत्त विभागप्रमुख/HOD), रील स्टार विशाल राठोड, आकाश पवार आणि करण आडे यांच्यात
सुमारे ५० लाख रुपयांचा आर्थिक व्यवहार झाला होता. आणि त्यातून झालेला वाद.५ फेब्रुवारीच्या रात्री पार्टीनंतर, परतीच्या प्रवासात साजापूर शिवारातील रेल्वे पुलाजवळ डोक्यात गोळी घालून हत्या केली.
पुरावा नष्ट केला
मृतदेह जंगलात गाडून, आरोपींनी ‘दृश्यम’ चित्रपटाप्रमाणे खोटा बनाव रचला होता, जो ४० दिवसांनी उघडकीस आला आहे. उस्मानपुरा पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
हे प्रकरण छत्रपती संभाजीनगरमधील ज्योतीनगर भागातील असून, निवृत्त प्राध्यापकाच्या हत्येने खळबळ उडाली आहे

