
अंबाजोगाई -येथील बसस्थानकात वेडसर महिलेंचा वावर वाढला असून,धिंगाणा,मारहाण व चालक-वाहकांना शिविगाळ करून बस रोखण्याचा प्रकार काल घडल्याने प्रवाशी वर्गात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर प्रकार हा काल शुक्रवार रोजी सकाळी 6 ते 7 च्या दरम्यान घडल्याने सदरील घटनेमुळे प्रवाशांमध्ये असुरक्षितेची भावना व्यक्त होत असून, आगार प्रमुख व पोलिसांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.

थोडक्यात माहिती अशी की,काल शुक्रवारी दोन वेडसर महिलांनी अंबाजोगाई बसस्थानकात एकच धुमाकूळ माजवला होता.चक्क एकमेकांना हाणामारी व नंतर वेड्याच्या भरात एसटी बस वाहक चालकाला शिविगाळ करण्याचा प्रकार झाला.ही घटना काल शुक्रवार रोजी सकाळी 6 ते 7 च्या दरम्यानची आहे.
बसस्थानकात या महिलेंमुळे प्रवासी वर्गात भीतीचे वातावरण पसरले होते.सदर महिलांनी केवळ धिंगाणाच घातला नाही तर एसटी बसेस समोर येवून बसेस अडवण्याचा प्रयत्न झाला.यावर गप्प न बसता बसेस च्या समोर येवून लिंबू कापून ,हातवारे करत भानामती सदृश्य प्रकारही केला.या महिलांना रोखण्यासाठी बसस्थानकात कोणीही पुढे आले नाही.गेल्या अनेक दिवसांपासून या बसस्थानकात वेडसर व्यक्तिंचा वावर वाढला आहे.आगार प्रमुखांसह संबंधित अधिकाऱ्यांकडून कसलीही कारवाई होत नाही,हे पाहून बसस्थानकात एटी बसने प्रवास करणाऱ्या प्रवासी वर्गात आता असुरक्षितेची भावना निर्माण झाली आहे.बसस्थानकात पोलिस कर्मचारी वर्दीत कधीच दिसून येत नाही.त्यामुळे भविष्यात बसस्थानकात गैरप्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

