स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात चप्पल सांभाळा !
हे चिञ आपणास विचलित करू शकतात…

अंबाजोगाई-आपण जर स्वा. रा.तीर्थ ग्रामीण रुग्णालयात जात असाल तर सावधान ! आपल्या चप्पल व बुट गायब होवू शकतात? आणि ते पण रुग्णालयातील कर्मचारी चप्पल,बुटांना पोत्यांमध्ये कोंबून इतरत्र घेवून जात असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.आशिया खंडातील सर्वात मोठ्या रुग्णालयात असे प्रकार निदर्शनास येत असून या प्रकरणी अधिष्ठाता हे लक्ष देतील का ? असा सवाल रुग्णांचे नातेवाईक करीत आहेत.
नियम सर्वांना वेगवेगळा का?


आपण वरील फोटोत जो कर्मचारी चप्पल, बुट पोत्यात भरत आहे,हे सर्व पादञाणे रुग्णालयात येणारे बेसावध रुग्ण व त्यांचे नातेवाईकांचे आहेत.येथे फक्त रुग्णांच्या बाबतीतच सदरील नियम का करण्यात आला आहे ? संबंधित डाॅक्टर,ब्रदर,नर्स,सुरक्षा गार्ड, सफाई कामगार आदींना लागू नाही का ? की केवळ फार्स म्हणून ही कारवाई करण्यात येत आहे. अगोदरच मार्च हिट महिना सूरू आहे.उन व उकाडा जाणवत आहे.अशात तेथे येणाऱ्या नागरिकांचे चप्पला गायब होत असतील अनवाणी फिरणाऱ्याचे प्रचंड हाल होणार नाहीत का ? असा सवाल उपस्थित होत असून या प्रकरणी अधिष्ठाता यांनी तत्काळ लक्ष द्यावे अशी मागणी रुग्णांचे नातेवाईक करीत आहेत.
लोकनाना न्यूज | संपादक-बालाजी खैरमोडे | अंबाजोगाई जि.बीड

