बीड-परळी येथील महादेव खून प्रकरणातील सर्व तपास हा गोयनीय असून या प्रकरणी अफवांवर विश्वास ठेवू नये याबाबत कोणी खोटी माहिती प्रसारीत करत असेल तर त्यावर कठोर कारवाई करण्यात येईल,असा खुलासा बीड तपास पथकाने प्रसिद्ध पञकाव्दारे दिला आहे.
मागील काही दिवसांपूर्वी परळी येथील समाजसेवक राजेश फड यांनी पञकार परिषद घेवून महादेव खून प्रकरणातील आरोपींची नार्को टेस्ट करण्यात आली आहे,यामध्ये आ.धनंजय मुंडे यांच्यासह इतर व्यक्तींची नावे घेत आरोप केला होता. यामुळे बीड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती.यामुळे सदरील माहिती लिक कशी झाली?असा प्रश्न सोशल मीडियावर चांगलाच चर्चिला जात होता.या पार्श्वभूमीवर महादेव मुंडे खून प्रकरणात बीड येथील पोलिसांच्या विशेष तपास पथकाने दि. 06 मार्च रोजी एक प्रसिद्धी पत्रकातून खुलासा केला.

महादेव मुंडे खुन प्रकरणाचे तपासाबाबत
फिर्यादी नामे अशोक दत्ताञय मुंडे वय 34 वर्ष रा.भोपळा ता.परळी जि.बीड हल्ली मुक्काम बॅक काॅलनी परळी वै. जि.बीड यांनी दिनांक 22/10 / 2023 रोजी पोलीम ठाणे परळी शहर येथे तक्रार दिली की, त्यांचा मोठा भाऊ नाव महादेव दत्तात्रय मुंडे वय वर्ष रा.भोपळा ता.परळी जि.बीड ह.मु बॅक काॅलनी ता.परळी जि.बीड यांचा दिनांक 21 /10 / 2023 रोजी 19.00 ते दिनांक 22/10/ 2023 रोजीचे सकाळी 07:00 वाजण्याचे सुमारास वन विभाग कार्यालय परळी वै. समोरील मोकळया जागेत कोणीतरी अज्ञात व्यक्तीने गळा चिरुन खुन केला आहे वगैरे मजकूराचे फिर्यादीवरून पोलीस ठाणे परळी शहर जि.बोड येये गुरनं 191/2023 कलम 302 भादंवि प्रमाणे अज्ञात आरोपींविरुद्ध दिनांक22/10/ 2023 रोजीं गुन्हा दाखल होता. सध्या सदर गु्हयांचे अनुषंगाने विशेष तपास पथक, बीड यांच्यामार्फत सखोल तपास सुरु आहे.सदर गुन्ह्याचे तपासादरम्यान काही संशयित इसम यांच्या पॉलीग्राफ / लाय डिटेक्टर, BEOS ब्रेन मॅपिंग तसेच नार्को अंनालिसिस अशा मानसशास्त्रीय चाचण्या करण्यात आलेल्या आहेत. सदर मानसशास्त्रीय चाचण्यांचे अहवाल हा अत्यंत गोपनीय स्वरुपाचा असून ते तपास यंत्रणेच्या अधिकृत
अभिलेखात सुरक्षीत आहेत सदर अहवाल कोणत्याही अनाधिकृत व्यक्तीस, माध्यमास अथवा सामान्य नागरिकास दाखविण्यात आलेले नाहीत अथवा त्याची कोणतीही माहीती देण्यात आली नाही. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये आणी जर कोणी खोटी माहीती प्रसारीत करीत असेल त्यावर कायदेशीर तरतुदीनुसार कठोर कारवाईं करण्यात येईल,
सदर गुन्हयाचा तपास हा विशेष तपास पथक बीड यांच्यामार्फत योग्य पद्धतीने व पारदर्शकरित्या कायदेशीर प्रक्रियेद्वारे सुरु असुन तपासाच्या हितासाठी आवश्यक त्या सर्व बाबींची सखोल पडताळणी करण्यात येत आहे,असे म्हटले आहे.


