लातूर | प्रतिनिधी
जागतिक महिला दिनानिमित्त आयुष्मान व्यसनमुक्ती केंद्रात महिलांचा सन्मान करून सत्कार कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. समाजातील महिलांचे कर्तृत्व, त्यांचे परिश्रम आणि समाजघडणीतील योगदान याची दखल घेत विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते महिलांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी महिलांचे समाजातील स्थान, महिलांचे सक्षमीकरण तसेच कुटुंब आणि समाजाच्या प्रगतीत महिलांची भूमिका यावर मार्गदर्शन केले.
तसेच व्यसनमुक्त समाज घडवण्यासाठी महिलांनी पुढाकार घेणे आवश्यक असून, कुटुंबातील सदस्यांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी महिलांची भूमिका महत्त्वाची असल्याचेही वक्त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमास आयुष्मान व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक डॉ संजय पाटील, संचालिका एडवोकेट शितल पाटील, समुपदेशक सालेम पठाण, तसेच पदाधिकारी, कर्मचारी तसेच परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे आयोजन आयुष्मान व्यसनमुक्ती केंद्राच्या वतीने करण्यात आले होते, शेवटी उपस्थितांचे आभार मानण्यात आले.

