महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त म.फुलेनगर झोपडपट्टी च्या वतीने विविध कार्यक्रम संपन्न; महापुरुषांना अभिवादन*
अंबाजोगाई:-दिनांक – १४ एप्रिल रोजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या महात्मा ज्योतिराव फूले नगर येथे शिस्तबद्ध वातावरणात साजरी करण्यात आली.
यानिमित्त फुलेनगर च्या वतीने मुक व कर्नबधिर यांना खिचडी वाटप करण्यात आली.सायंकाळी खिचडी, अन्नदान व पाणी पाऊचही देण्यात आले.फुलेनगर मित्र मंडळाच्या माध्यमातून कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाची सुरुवात 13 एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी भिम गितांचा कार्यक्रमाच्या माध्यमातून सुरूवात करण्यात आली. 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करूण ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी, मा.आमदार पृथ्वीराज साठे, अंबाजोगाई न.प. उपनगराध्यक्ष दिनेश भराडिया,माजी नगरसेवक कमलाकर आण्णा कोपले,नगरसेवक संजय गंभिरे, दिग्गविजय लोमटे, पत्रकार अभिजित लोमटे ,शेख फेरोज, रिपब्लिकन बहुजन सेनेचे जि.अध्यक्ष दयानंद लांडगे , सुरेश मिसाळ सर, मराठी पत्रकार परिषद चे ता.अध्यक्ष बालाजी खैरमोडे, संपादक एसएस उदारे, नगर सेवक सचिन जाधव, किरण भालेकर व ईतर मान्यवरांनी बाबासाहेबांच्या विचारांचे स्मरण केले.

याप्रसंगी ‘बाबासाहेबांचे सामाजिक विचार आणि वर्तमान काळ’ या विषयावर मा.आमदार पृथ्वीराज साठे,सुरेश मिसाळ यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.यात अनेक विचारवंतांनी बाबासाहेबांच्या समतावादी विचारांवर प्रकाश टाकला.मा.फुलेगर झोपडपट्टी च्या वतीने पाणी पाऊच, खिचडी अन्नदान वाटप करण्यात आले. तसेच जयंती समिती अध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी साहेबराव लोंढे, राजू बलाडे, कैलास वाघमारे, रोहित ढवारे , आदित्य गायकवाड , प्रविण जोगदंड, निलेश जोगदंड, रोहित वाघमारे, रूपेश वाघमारे, निखिल जोगदंड , गोविंद शिंदे ,आमर जोगदंड, प्रदिप थोरात,रवि मस्के,सुरज पोटभरे, बबन वावळकर, धनराज जोगदंड, महेंद्र मस्के यांनी विशेष परिश्रम घेतले होते.यावेळी मोठ्या संख्येने नागरिक,महिला आणि तरुण कार्यकर्ते उपस्थित होते.
सर्वांनी डॉ.आंबेडकरांच्या ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ या त्रिसुत्रीचा अंगीकार करण्याचा संकल्प केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पञकार मारुती जोगदंड यांनी केले, तर आभार प्रदर्शन साहेबराव लोंढे यांनी केले.यावेळी नागरिक,महिला आणि तरुण कार्यकर्ते उपस्थित होते.

