■ टी.बी.गिरवलकर पॉलिटेक्निक मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स ऍण्ड मशिन लर्निंग आणि इलेक्ट्रॉनिक्स ऍण्ड कम्यूनिकेशन इंजिनिअरींग या दोन अभ्यासक्रमास अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद दिल्ली (एआयसीटीई) यांची मान्यता
■ प्रवेश घेण्यासाठी टी.बी.गिरवलकर पॉलिटेक्निकला विद्यार्थ्यांचे प्रथम प्राधान्य
अंबाजोगाई (प्रतिनिधी) येथील महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्था संचलित, टी.बी.गिरवलकर पॉलिटेक्निक मध्ये, शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून आर्टिफिशियल इंटेलिजन्स ऍण्ड मशिन लर्निंग (६० जागा) व इलेक्ट्रॉनिक्स ऍण्ड कम्यूनिकेशन इंजिनिअरींग (६० जागा) या दोन अभ्यासक्रमांना अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, दिल्ली (एआयसीटीई) यांची मान्यता मिळाली आहे. अशी माहिती कॅम्पस डायरेक्टर डॉ.बी.आय.खडकभावी यांनी दिली. पुर्वीप्रमाणेच प्रवेश घेण्यासाठी टी.बी.गिरवलकर पॉलिटेक्निकला विद्यार्थ्यांचे प्रथम प्राधान्य मिळत असून विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे.

या दोन नविन अभ्यासक्रमामुळे ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांना आपल्या आवडत्या अभ्यासक्रमात डिप्लोमा इंजिनिअरींग होण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. टी.बी.गिरवलकर पॉलिटेक्निक हे मागील ४३ वर्षांपासून विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षणाचे धडे देणारे नावाजलेले पॉलिटेक्निक म्हणून ओळखले जाते.

या महाविद्यालयात पूर्वीपासूनच कॉम्प्यूटर इंजि., इलेक्ट्रीकल इंजि., मेकॅनिकल इंजि., सिव्हील इंजिनियरींग हे अभ्यासक्रम चालवले जातात. दोन नविन अभ्यासक्रमांमुळे ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांना आपल्या आवडत्या अभ्यासक्रमात डिप्लोमा इंजिनिअरींग होण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. या अभ्यासक्रमात शिक्षण घेऊन या महाविद्यालयाचे विद्यार्थी देशविदेशात अनेक पदांवर कार्यरत आहेत. या पॉलिटेक्निक मध्ये शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये झालेल्या महिंद्रा ऍण्ड महिंद्रा, बजाज, धुत ट्रान्समिशन, विप्रो, महापारेशन, टीसीएस, इन्फोसिस, महावितरण, जॉन डीअर, लार्सन ऍण्ड ट्युब्रो, हंसा प्लेक्स या नांमांकीत कंपन्यांच्या कॅम्पस मुलाखतीमध्ये १०० टक्के विद्यार्थ्यांची निवड होवून आकर्षक पगारावर काम करण्याची संधी मिळाली आहे. तसेच इंटर्नशिप करीता विद्यार्थ्यांची निवड होऊन या नामांकीत कंपन्यांमध्ये आकर्षक मानधनावर कामाचा अनुभव मिळवून भविष्यात चांगल्या नोकरीची संधी उपलब्ध होण्याची संधी मिळाली आहे. आय.डी.एस.एस.ए.अंतर्गत छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या क्रीडा स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी पारितोषिक संपादन केले. विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. यामध्ये क्रीडा स्पर्धा, शिवजयंती उत्सव-२०२६, वृक्षारोपण, मुलींसाठी आत्मभान शिबीर, प्रकल्प स्पर्धा, अर्थसाक्षरतेचे महत्व अशा विविध उपक्रमात विद्यार्थी उत्स्फूर्त सहभाग नोंदवतात. उन्हाळी व हिवाळी परीक्षेत या पॉलिटेक्निकचा निकाल सतत उंचावत आहे. या वर्षी हिवाळी परीक्षा २०२५ मध्ये विद्यार्थ्यांनी निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या गुणवत्ताधारक शिष्यवृत्ती करीता १७ विद्यार्थी पात्र ठरले. शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासावर भर दिला जातो. देश, विदेशात या पॉलिटेक्निकचे विद्यार्थी विविध पदांवर कार्यरत आहेत. त्या माजी विद्यार्थ्यांकडून त्यांच्या कामाचा. अनुभव व मार्गदर्शन सध्या शिक्षण घेत असलेल्या पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांना होत आहे. हेच विद्यार्थी देशाचे व महाविद्यालयाचे नांव उज्वल करत आहेत. महाविद्यालयाच्या व विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आदिनाथ बसवंतराव सांगवे, उपाध्यक्ष माधवराव त्रिंबकराव पाटील चिंचोलीकर, सचिव माधवराव हणमंतराव पाटील टाकळीकर, सहसचिव सुनिल सिद्रामप्पा मिटकरी, कार्यकारी संचालक प्रदीप विश्वनाथप्पा दिंडीगावे, सर्व संचालक, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य व मार्गदर्शक डॉ.बी.आय.खडकभावी, कार्यवाहक प्राचार्य डॉ.एन.ए.रावबावले यांनी अभिनंदन केले. टी.बी.गिरवलकर पॉलिटेक्निकचे प्राचार्य एल.व्हि.बगले, सर्व विभागप्रमुख आणि कर्मचारीवर्ग यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासोबत त्यांच्या सर्वांगिण विकासावर सुधारणा घडवून आणत आहेत.

