■ ग्रामीण भागातील पञकारांना टीव्ही ॲकर होण्यासाठी सर्व गोष्टीचा अभ्यास व मराठी /हिंदी भाषेवर प्रभुत्व असणे आवश्यक आहे !
■ उदगीर येथील अधिवेशनात सुप्रसिद्ध टीव्ही ॲकर प्रसन्न जोशी,विशाल परदेशी,प्रज्ञा पोवळे,श्वेता दांडेकर, सौरभ कोरटकर, विशाल पाटील यांनी “टीव्ही पडद्यावरची दुनिया” या विषयावरील चर्चेत केले आवाहन
*उदगीर / अंबाजोगाई- लोकनामा विशेष रिपोर्ट*
लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे ४४ वे अधिवेशन १८ व १९ एप्रिल या दोन दिवसांत उत्साहात पार पडले. देशभरातून आलेल्या पत्रकार, संपादक आणि माध्यम प्रतिनिधींच्या उपस्थितीत हे अधिवेशन विचारमंथन, मार्गदर्शन आणि पत्रकारितेच्या विविध पैलूंवर चर्चा करण्यासाठी महत्त्वाचे व्यासपीठ ठरले.

अधिवेशनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन सत्रात पत्रकारितेतील बदलते स्वरूप, डिजिटल माध्यमांचा वाढता प्रभाव आणि पत्रकारितेतील नैतिकता या विषयांवर सखोल
चर्चा झाली. वक्त्यांनी पत्रकारांनी वस्तुनिष्ठता, सत्यता आणि जबाबदारी जपत काम करणे आजच्या काळात अधिक आवश्यक असल्याचे अधोरेखित केले.
दुसऱ्या दिवशी विविध विषयांवर तांत्रिक सत्रांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ‘डिजिटल पत्रकारिता’, ‘फेक न्यूजचा वाढता धोका’, ‘ग्रामीण पत्रकारितेची आव्हाने’ आणि ‘अँकरिंग व संवाद कौशल्य’ या विषयांवर तज्ज्ञ पत्रकारांनी मार्गदर्शन केले. सहभागी पत्रकारांनी या सत्रांमध्ये सक्रिय सहभाग घेत अनुभव शेअर केले आणि प्रश्नोत्तरांद्वारे आपले शंका निरसन करून घेतले.

ग्रामीण भागातील पञकारांना टीव्ही ॲकर होण्यासाठी सर्व गोष्टीचा अभ्यास व मराठी /हिंदी भाषेवर प्रभुत्व असणे आवश्यक आहे !
*ग्रामीण भागातील पञकारांना टीव्ही ॲकर होण्यासाठी सर्व गोष्टीचा अभ्यास व मराठी /हिंदी भाषेवर प्रभुत्व असणे आवश्यक आहे ,असे उदगार आज झालेल्या उदगीर येथील व्दितीय सञातील अधिवेशनात सुप्रसिद्ध टीव्ही ॲकर प्रसन्न जोशी,विशाल परदेशी,प्रज्ञा पोवळे,श्वेता दांडेकर, सौरभ कोरटकर, विशाल पाटील यांनी “टीव्ही पडद्यावरची दुनिया” या विषयावर सविस्तर चर्चा करताना व्यक्त केले.*
अधिवेशनादरम्यान काही महत्त्वपूर्ण ठरावही मंजूर करण्यात आले. पत्रकारांच्या हक्कांचे संरक्षण, त्यांना सामाजिक सुरक्षा योजना लागू करणे, तसेच ग्रामीण भागातील पत्रकारांना अधिक सुविधा मिळाव्यात, यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
समारोप सत्रात आयोजकांनी अधिवेशनाच्या यशस्वी आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केले. उपस्थित मान्यवरांनी अशा अधिवेशनांमुळे पत्रकारांना दिशा आणि नवी ऊर्जा मिळते, असे मत मांडले.
एकूणच, उद्गीर येथे पार पडलेले अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे ४४ वे अधिवेशन पत्रकारितेच्या क्षेत्रातील सध्याच्या प्रश्नांवर प्रकाश टाकणारे आणि भविष्याची दिशा ठरवणारे ठरले.
दोन दिवसीय अधिवेशनाचे अध्यक्ष मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख सर व अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर हे होते.तर विश्वस्त किरण नाईक, शरद पाबळे,कार्याध्यक्ष शिवराज काटकर, सरचिटणीस सुरेश नाईकवाडे,कोषाध्यक्ष मन्सूरभाई शेख,महिला आघाडी प्रमुख शोभा जयपूरकर, डिजीटल मिडीया चे राज्याध्यक्ष अनिल वाघमारे,बीड जिल्हाध्यक्ष विशाल सांळुके सह आदी पदाधिकाऱ्यांनी नियोजनबद्ध अधिवेशन कार्यात उपस्थिती होती.
दोन दिवसीय संपन्न झालेल्याअधिवेशनात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो पञकार उपस्थित होते.अधिवेशन यशस्वी करण्यासाठी उदगीर संघाचे विभागीय सचिव तसेच अधिवेशन मुख्य संयोजक सचिन शिवशेट्टे, रवी उबाळे,प्रकाश कांबळे,उदगीर तालुकाध्यक्ष युवराज धोतरे,डीजीटल मिडीया तालुकाध्यक्ष विभीषन मद्देवाड, हल्ला कृती तालुकाध्यक्ष अर्जून जाधव,सचिव सिद्धार्थ सूर्यवंशी आदींनी परिश्रम घेतले.

