■ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे ज्ञानाचे मूर्तिमंत प्रतीक – नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई धर्माधिकारी
■ परळीत ठिकठिकाणच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रमांना उपस्थित राहून अभिवादन
परळी वैद्यनाथ (प्रतिनिधी) – भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे ज्ञानाचा अथांग सागर होते. खऱ्या अर्थाने ते ज्ञानाचे मूर्तिमंत प्रतीक आहेत. न्याय, समता, बंधुता या विचारानेच देशाची प्रगतीकडे वाटचाल होणार आहे. आपण सर्वांनी बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा आपल्या कृतीत आणायला हवा, असे प्रतिपादन परळीच्या नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ठिकठिकाणी आयोजित कार्यक्रमात अभिवादन व विचार व्यक्त करताना केले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त परळी वैद्यनाथ शहरातील रेल्वे स्थानक परिसरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास माजी मंत्री आ.धनंजय मुंडे व सहकाऱ्यांच्या समवेत पुष्पहार अर्पण करून त्यांनी अभिवादन केले. तसेच परळी शहरातील भीम नगर येथे आयोजित करण्यात आलेल्या जयंती कार्यक्रमात शालेय साहित्य वाटप कार्यक्रमास उपस्थित राहून शालेय साहित्याचे वितरण केले.

परळी वैजनाथ नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात प्रमुख उपस्थित राहून आपलं मनोगत व्यक्त करत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची देशाला अत्यंत गरज असल्याचे प्रतिपादन केले.

त्याचबरोबर रेल्वे कर्मचारी यांच्या वतीने आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रमात प्रमुख उपस्थित रहात त्यांनी महामानवाला अभिवादन केले.

शहरातील ठीकठिकाणच्या बुद्ध विहार व ठिकठिकाणी आयोजित भीम जयंती कार्यक्रमानिमित्त भेटी देऊन महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले .आ.धनंजय मुंडे यांच्या हस्ते आजच्या शुभमुहूर्तावर मिलिंद नगर येथे उभारण्यात आलेल्या भव्य नालंदा बुद्ध विहाराचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा सौ. पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती. ठिकठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या विविध उपक्रम, जयंती कार्यक्रमास नगरपरिषदेतील सहकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

