अंबाजोगाई – येथील स्वा.रा.तीर्थ ग्रामीण रुग्णालयात अँड.इस्माईल चौधरी यांना मारहाण झाल्याच्या निषेधार्थ संबंधित सुरक्षा रक्षकावर कारवाई करण्याऐवजी अँड. चौधरी व एम आय एमचे नेते शेख रमीज यांच्यावर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घेण्यात यावे व रूग्णालयातील सुरक्षा रक्षकांना कामावरून काढून टाकण्यात यावे ,यासाठी आज उपजिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.परंतू,दुसरीकडे संबंधित रुग्णालय परिसर,वसतीगृहाची सुरक्षितता लक्षात घेता सुरक्षा रक्षकांची संख्या कमी न करता ती कायम ठेवावी अशा आशयाचे निवेदन “स्वा.रा.तीर्थ मार्ड संघटनेच्या डाॅक्टरांनी दिल्याने रुग्णालयाचे प्रकरण जिल्ह्यात चांगलेच गाजत आहे.

आज दुपारी अंबाजोगाईत अँड.इस्माईल चौधरी यांच्या मारहाण प्रकरणी उपजिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला.या मोर्चात माजी आमदार पृथ्वीराज साठे,राष्ट्रवादी काँग्रेस चे राजकिशोर मोदी, अमर देशमुख, मनसेचे सुनिल जगताप, राजेश वाहुळे सह आदी राजकीय कार्यकर्त्यांनी भाग घेवून निषेध केला होता.
तर दुसरीकडे आजच स्वा.रा.तीर्थ ग्रामीण रुग्णालयातील (मार्ड) संघटनेतील निवासी डाॅक्टरांनी अधिष्ठाता धपाटे यांना एक निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे की,आपल्या महाविद्यालय व रुग्णालय परिसरातील सुरक्षा व्यवस्था सुरळीत राखण्यासाठी MSF जवांनाचे मोठे योगदान आहे.रुग्णालयामध्ये दररोज मोठ्या प्रमाणावर रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची ये-जा होत असते.अशा परिस्थितीत कायदा व सुव्यवस्था राखणे आपत्कालीन परिस्थिती हाताळणे तसेच कर्मचारी व विद्यार्थाची सुरक्षा सुनिश्चित करणे यासाठी MSF जवान अत्यंत आवश्यक आहेत.
तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार तसेच शासन निर्णय नूसार सार्वजनिक आरोग्य संस्थांमध्ये सुरक्षा व्यवस्था सक्षम ठेवणे बंधनकारक आहे.त्या नूसार रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय परिसरात पुरेशा प्रमाणात सुरक्षा कर्मचारी उपलब्ध असणे आवश्यक आहे.जवानांची संख्याबळ कमी झाल्यास सुरक्षेवर विपरीत होण्याची शक्यता आहे.त्यामुळे महाविद्यालय ,रुग्णालय परिसर व वसतीगृह याची सुरक्षीतता लक्षात घेऊन सुरक्षा रक्षकांची संख्याबळ कमी न करता ती कायम ठेवावी अशा आशयाचे निवेदन दिले आहे.

या निवेदनावर डाॅ.पुलकित आगरवाल, डाॅ.भूमिका धानोरकर डाॅ.शिवानी काकडे. डाॅ.शिवानी खांडेकर, डाॅ.मयूरी इबीतवार,डाॅ.इम्रान सय्यद, डाॅ.शुभम धांडे,डाॅ.संतोष चांदणे सह आदी डाॅक्टरांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

