अचूक हवामान अंदाज वर्तविण्यात प्रसिद्ध असलेले हवामान तज्ज्ञ पंजाब डक यांनी आता हवामानाचा अंदाज देणार नसल्याचे स्पष्ट केले असून तसा व्हिडिओ आज सोशल माध्यमावर गुडी पाडव्याच्या शुभ मुहुर्तावर केल्याने शेतकरीवर्गात चर्चेला एकच उधाण आले आहे.

थोडक्यात माहिती अशी की,गेल्या 4 दिवसांपासून महाराष्ट्रात व कर्नाटक भागातील काही जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडून गारपीट होईल,असे भाकीत प्रसिद्ध हवामान तज्ज्ञ पंजाब डक यांनी केला होता.त्यानूसार महाराष्ट्रातील संभाव्य ठिकाणी गारांचा पाऊस झाला.त्यांचा हा अंदाज शेतकरीवर्गासाठी कधी फायदा तर कधी नुकसानीचा ठरल्याने त्यांच्याबद्दल शेतकरीवर्गात “कभी खुशी कभी गम “अशी सहानुभूती आहे.परंतू मराठवाडा, विदर्भ ,खानदेशातील शेतकरी पंजाब डक यांनी केलेल्या अंदाजनूसार शेतीतील कामाबाबत नेहमीच सतर्क राहण्याचा प्रयत्न करतात.पंजाब डक यांच्या भविष्यवाणी मुळे शेतातील गव्हू,ज्वारी,कांदा व इतर नगदी पिकांचे नुकसान होण्यापासून मदत होते.माञ याचा दुसरा परिणाम व्यापारी वर्गावर होताना दिसून येतो.पंजाब डक यांनी वर्तविण्यात आलेले भाकीत फर्टिलायझर व्यापाऱ्यांच्या मुळावर बसले असल्याचा गैरसमज पसरत आहे. पंजाब डक यांच्यामुळे शेतकरी सावध होत असून,पिके वाचवत आहेत व त्यामुळे मार्केट मध्ये शेतकरीवर्ग खरेदीसाठी येत नाहीत, असा गैरप्रचाराची चर्चा ही सोशल मिडियावर करण्यात येत आहे.
अवकाळी पावसामुळे शेताचे नुकसान होवू नये म्हणून पंजाब डक यांनी पश्चिम महाराष्ट्र सह,खानदेश,मराठवाडा ,विदर्भ यांनी चार दिवसांपासून अचूक हवामान अंदाज वर्तवले होते.त्यानुसार गारपीट होवून अवकाळी पाऊस झाला.
*पश्चिम महाराष्ट्रासाठी अंदाज वर्तविण्यात येणार नाही*
माञ आता पंजाब डक यांनी टोकाचा निर्णय घेतला असून आज गुडी पाडव्याच्या शुभ मुहुर्तावर आज एक व्हिडिओ वायरल केला. सोशल माध्यमाव्दारे त्यांनी पश्चिम महाराष्ट्रामधील सांगली,सातारा जिल्ह्यातील हवामान अंदाज येथून पुढे देणार नसल्याचे जाहीररित्या सांगितले. खानदेशातील नंदूरबार, धुळे ,जळगाव,मराठवाडय़ातील संभाजीनगर,लातूर,बीड,धाराशिव,नांदेड,परभणी सह विदर्भातील सर्व जिल्ह्यातील अंदाज देणार असल्याचे जाहीर केले. पश्चिम महाराष्ट्राबाबत पंजाब डक यांनी अचानक असे पाऊल का उचलले याची जोरदार चर्चा होत आहे.

