कालची घटना नेमकी कशामुळे घडली याची संपूर्ण चौकशी करून कारवाई झाली पाहीजे-खा.बजरंग सोनवणे
अंबाजोगाई-स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात काल झालेली मारहाण घटना निंदनीय असून यात अधिष्ठाता हे या प्रकरणात जबाबदार नाहीत.परंतू संपूर्ण रूग्णालयावर लक्ष देणे हे त्यांचे काम आहे, मारहाणीची घटना का.घडली याची खोलात जावून चौकशी झाली पाहिजे अशी प्रतिक्रिया खा.बजरंग बप्पा सोनवणे यांनी पञकारांशी बोलतांना दिली.

यावेळी ते म्हणाले की,सुरक्षा रक्षकांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी.ज्या ठिकाणी अँड .गवळी यांना मारहाण झाली त्या रूममध्ये सी सी टी व्ही बसवण्यात आलेले नाही,तेव्हा अधिष्ठाता धपाटे यांनी तत्काळ सीसीटीव्ही उपलब्ध करून भविष्यात मारहाणीच्या घटना होवू नये याची खबरदारी घ्यावी. राजकारणाला या ठिकाणी थारा देऊ नका.
नेमके या मारहाण प्रकरणी कोण जबाबदार आहे याची खोलवर चौकशी करून कारवाई करण्यात यावी,असे रोकठोक मत खा.सोनवणे यांनी व्यक्त केले.

