अंबाजोगाई (प्रतिनिधी) सर्वज्ञ दासोपंतांच्या अध्यात्मिक ग्रंथात मार्गदर्शक तत्वे असून त्यांचा पंचीकरण पासोडी हा जगप्रसिद्ध ग्रंथ म्हणजे अनमोल ठेवा आहे असे मत एबीपी माझा वृत्त वाहिनीच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक यांनी व्यक्त केले.

त्यांनी पंचीकरण पासोडी या जग प्रसिद्ध ग्रंथांचे निरीक्षण केल्या नंतर त्या म्हणाल्या की, सर्वज्ञ दासोपंतांनी अध्यात्मिक क्षेत्रात वैशिष्ट्यपुर्ण लिखाण केले पासोडीच्या माध्यमातून वेदांत, आकृतीसह स्पष्टीकरण आणि चिकित्सक मांडणी दिसते हा अमुल्य विषय सदैव चिंतनात्मक रहावा याच उद्देशाने त्यांनी कापडावर लेखन केले आहे. दासोपंतांच्या साहित्याचा प्रचार आणि प्रसार जोमाने होत आहे.हे मोठे समाज उथ्थानाचे कार्य असल्याचे त्या म्हणाल्या.सरिता कौशिक यांचे भक्त गणांच्या वतीने स्वागत करण्यात आले.
यावेळी जेष्ठ पत्रकार सुदर्शन रापतवार, राहुल देशपांडे, आशुतोष रापतवार, जितेंद्र देशपांडे,दत्तप्रसाद रादंड,कल्याणी देशपांडे आदी उपस्थित होते.

