
अंबाजोगाई (विशेष बातमी) अंबाजोगाई येथील प्रस्तावित जिल्हा कारागृहाच्या 30 एकर शासकीय जमिनीला संरक्षक भिंतीसाठी 4 कोटी रुपयांचा निधीला मान्यता मिळवून आणणे असो वा केज घरकुल भ्रष्टाचार प्रकरणी आवाज उठवणे असो वा काल विधान भवनात झालेल्या अर्थ संकल्पीय अधिवेशनात केज-अंबाजोगाई एमआयडीसी चा प्रश्ना बाबतचा गंभीर मुद्दा असो,अत्यंत सुनियोजित,मुद्देसूद मांडणी करीत मुख्यमंञ्यासह संपूर्णमञिमंडळात छाप पाडण्यात आमदार नमिता मुंदडा हे पुर्णपणे यशस्वी झाल्याचे दिसून येत आहे.एखाद्या मुरब्बी राजकारणी नेत्याप्रमाणे आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी सभागृहात पाठपुरावा करून संपूर्ण बीड जिल्ह्याचे लक्ष वेधून घेणार्या त्या प्रभावी आमदार ठरल्या आहेत.
अंबाजोगाई : अंबाजोगाई येथील प्रस्तावित जिल्हा कारागृहाच्या ३० एकर शासकीय जमिनीला सुरक्षा कारणास्तव संरक्षक भिंत उभारण्यासाठी बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी ४ कोटी ५ लक्ष ७९ हजार २५८ रुपयांच्या निधीला अधिकृत प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे. अंबाजोगाई येथे जिल्हा कारागृह व्हावे आणि या नियोजित जागेवर भविष्यात कोणतीही अतिक्रमणे होऊ नयेत, यासाठी आमदार नमिता मुंदडा यांनी शासनाकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला या निर्णयामुळे मोठे यश मिळाले आहे. ही प्रशासकीय मान्यता जिल्हा वार्षिक योजना सन २०२५-२०२६ अंतर्गत देण्यात आली आहे.
या महत्त्वपूर्ण प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा वार्षिक योजना २०२५-२६ अंतर्गत या कामाला मंजुरी देण्यात आली असून यामध्ये कारागृहाच्या सर्वे क्रमांक १/अ/५ मधील ३० एकर परिसराची नाकेबंदी करण्यासाठी मोठी संरक्षक भिंत उभारली जाणार आहे. अधिक्षक जिल्हा कारागृह यांच्यामार्फत या कामाची अंमलबजावणी केली जाणार असून या कामासाठी ९ जानेवारी २०२६ रोजी तांत्रिक मान्यता देण्यात आली होती.

केज – अंबाजोगाई एमआयडीसीला गती द्यावी
महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२६ दरम्यान केज व अंबाजोगाई येथे एमआयडीसी स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण मुद्दा सभागृहात मांडला.
राज्यातील बहुतांश तालुक्यांमध्ये औद्योगिक वसाहती उपलब्ध असताना केज आणि अंबाजोगाई येथे अद्याप इंडस्ट्रियल एरिया नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. या परिसरात कुशल मनुष्यबळ उपलब्ध असून गुंतवणूकदारांसाठीही हे शहर सोयीस्कर असल्यामुळे उद्योगविकासाला मोठी संधी आहे,
या भागातील सुशिक्षित बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात आणि स्थानिक पातळीवर औद्योगिक विकासाला चालना मिळावी यासाठी केज व अंबाजोगाई एमआयडीसीच्या प्रस्तावांना त्वरित मान्यता द्यावी, अशी ठाम मागणी सभागृहात केली.

याच अर्थसंकल्पीय अधिवेशनात केज-अंबाजोगाई तालुक्यातील दोन प्रमुख रस्ते कामांसाठी 25 कोटी रुपयेंच्या निधीची तरतूद करण्यात आली.
प्रस्तावित कामांनुसार धारूर, तांदळवाडी, उंदरी,कळंब अंबा आणि होळ या गावांना जोडणाऱ्या मार्गावरील 9.50 किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी रुंदीकरणासह सुधारणा करण्यात येणार आहे. या कामासाठी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.हा रस्ता सुधारण्यासाठी प्रदीर्घ काळापासून मागणी होत होती.त्याचप्रमाणे, अंबाजोगाई तालुक्यातील नागापूर, साकूड ते अंबाजोगाई या दरम्यानच्या १५ किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे रुंदीकरण व सुधारणा करण्याचे काम अर्थसंकल्पात प्रस्तावित करण्यात आले असून त्यासाठी १५ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद देखील करण्यात आली आहे.

