जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळेत विद्यार्थ्यांना बक्षीस वाटप
अंबाजोगाई ( प्रतिनिधी ) अशोक कोळी यांजकडून
अंबाजोगाई तालुक्यातील धानोरा खुर्द येथे जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांनी वार्षिक स्नेहसंमेलनात उत्कृष्ट नृत्य सादर केले होते तसेच शाळेत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेत सहभाग घेऊन बक्षीस जिंकले. या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण मंगळवार रोजी करून गुणगौरव करण्यात आला.
जिल्हा परिषद उर्दू शाळेत विद्यार्थ्यांनी वार्षिक स्नेहसंमेलनात उत्कृष्ट नृत्य सादर केलेल्या आणि जानेवारी महिन्यात खेळाच्या स्पर्धा आणि निबंध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. प्रथम दुतीय तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना स्मृतीचिन्ह आणि शालेय साहित्य बक्षीस स्वरूपात वितरण करण्यात आले. यावेळी सरपंच पार्वतीबाई पोळ, माजी सरपंच सुरेश जगताप, शालेय समितीचे अध्यक्ष ताहेर पटेल, सिद्दिक सय्यद,महादेव जगताप,रज्जाक पटेल,लायक सय्यद, असलम सय्यद, महादेव पोळ, मोहम्मद सय्यद, बळीराम डूडुले,सूर्यकांत धायगुडे, कचरू रंजवे, उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिका अंजुम शेख, नाजेमा अंजुम शेख,महमूद सय्यद यांची उपस्थिती होती.

