अंबाजोगाई (प्रतिनिधी):- अंबाजोगाई शहरातील सामाजिक कार्यकर्ते खलीलुद्दीन जाफरी यांचा मुलगा चि उमरान जाफरी याने केवळ सात वर्षांच्या वयात त्याचा पहिला रोजा (उपवास) ठेवला आहे. दिवसभर उपवास करून उमरान संध्याकाळी रोजा सोडतानाचा जाफरी कुटुंबासाठी तो एक अत्यंत कौतुकास्पद क्षण होता. कारण त्याच्या वयात असा उपवास ठेवणे हे साधारणतः अपवादात्मक असे मानले जाते. उमरानने केलेला हा उपवास त्याच्या संपूर्ण धार्मिक परंपरेनुसार केला. कुटुंबातील सर्व जेष्ठ सदस्यांनी उमरानला धार्मिक श्रद्धा आणि संस्कृतीतून त्याला रोजा ठेवण्यासाठी प्रेरित केले. त्याला एक उत्तम नागरिक आणि धार्मिक विचारांमध्ये प्रगल्भ होण्यासाठी प्रोत्साहित करत आहोत. त्याने आपल्या वयाप्रमाणे उपवास ठेवला त्यामुळे त्याच्यातील आत्मविश्वास वाढला असल्याचे त्याचे वडिल खलीलुद्दीन जाफरी यांनी सांगितले.
उम्रानने या वयात केलेल्या उपवासाबद्दल त्याचे माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी , उपाध्यक्ष दिनेश भराडीया, गटनेते सय्येद ताहेर, नगरसेवक मुन्ना पठाण, यांच्यासह चि उमरान याच्या मित्रांनीही त्याचे अभिनंदन केले आहे आणि त्याच्या धार्मिक शिस्त आणि कष्टांची प्रशंसा केली आहे. लहान वयात केलेल्या सहसामुळे उमरानची शारीरिक आणि मानसिक शिस्त अधिक चांगली होईल. त्याच्या या प्रगल्भतेमुळे त्याला भविष्यात अनेक मोठ्या आव्हानांचा सामना करण्याची ताकद मिळेल. त्याच्या या कठोर परिश्रमामुळे त्याच्यावर सर्वांनाच अभिमान आहे आणि तो आणखी मोठा करियर गाठण्याच्या दिशेने पुढे जाईल अशी भावना उमरांनच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे.

