■ मोरेवाडी येथे १९ ते २६ एप्रिल दरम्यान रौप्य महोत्सवी अखंड हरिनाम सप्ताहात श्री तुकोबाराय चरित्र कथेचे आयोजन*
■ पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी लाभ घ्यावा – समस्त गावकरी मंडळी, मोरेवाडी यांचे आवाहन
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
तालुक्यातील मौजे मोरेवाडी येथील हनुमान मंदिरात १९ ते २६ एप्रिल २०२६ दरम्यान रौप्य महोत्सवी भव्य अखंड हरिनाम सप्ताह, श्री तुकोबाराय चरित्र कथा, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व भजन किर्तन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. सप्ताह आयोजनाचे हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. त्यानिमित्त भव्य अखंड हरिनाम सप्ताहाचा प्रारंभ रविवार, दिनांक १९ एप्रिल रोजी होत असून याची सांगता रविवार, दिनांक २६ एप्रिल २०२६ रोजी होणार आहे. तरी पंचक्रोशितील सर्व भाविक भक्तांनी या संपूर्ण सप्ताहाचा लाभ घ्यावा असे आवाहन समस्त गावकरी मंडळी, मोरेवाडी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

सर्व भाविक भक्तांना कळविण्यात आनंद होतो की, वै.गुरूवर्य ह.भ.प.माधवबुवा शास्त्री मुकुंदराज संस्थान अंबाजोगाई यांच्या कृपा आशिर्वादाने मौजे मोरेवाडी येथे वार्षिक नियमाप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह संपन्न होत आहे. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध किर्तनकार व प्रवचनकार यांना पाचारण करण्यात आले आहे. कथाकार गुरूवर्य ह.भ.प.महादेव महाराज बोराडे (शास्त्री), जगतगुरू तुकोबाराय संस्थान पावनधाम, औरंगपूर हे श्री तुकोबाराय चरित्र कथा दर्शन घडवतील. मित्ती शु.३, अक्षयतृतीया, रविवार, दि.१९ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ७.०० वाजता कलशपुजन, ज्ञानेश्वरी ग्रंथपुजन, टाळ मृदंग, विणा पुजन, ह.भ.प.किसन महाराज पवार (अध्यक्ष, मुकुंदराज भजनी मंडळ, अंबाजागाई) यांच्या हस्ते होईल. व त्यानंतर सप्ताहास प्रारंभ होईल. यावेळी मार्गदर्शक म्हणून ह.भ.प.उद्धव बापु आपेगावकर, ज्ञानेश्वरी पारायण प्रमुख ह.भ.प.केशव महाराज वाघाळाकर, गाथा भजन प्रमुख ह.भ.प.दामु भालेकर व ह.भ.प.शिवाहरी गडदे (चिचखंडी) हे उपस्थित राहणार आहेत. तसेच याप्रसंगी त्यांना गुरूवर्य ह.भ.प.महादेव महाराज बोराडे (शास्त्री) यांचे सहकारी मृदंगवादक ह.भ.प.ऋषिकेश महाराज जाधव, गायन साथ ह.भ.प.हर्षद महाराज दसवडकर आणि गायन साथ ह.भ.प.मनोज महाराज शिंदे यांची लाभणार आहे. या सप्ताहात विशेष संगीत कार्यक्रमांचे आयोजन २०, २३, २४ व २५ एप्रिल रोजी रात्री १०.३० वाजता करण्यात आले आहे. त्यात सोमवार, दिनांक २० एप्रिल रोजी रात्री १०.३० वाजता मृदंग संवाद हा ज्येष्ठ पखावज वादक ह.भ.प.उद्धव बापु आपेगावकर यांचा विशेष संगीत कार्यक्रम होईल. त्यांना हार्मोनियम वर प्रा.विश्वजीत धाट यांची साथ लाभेल. गुरूवार, दिनांक २३ एप्रिल रोजी रात्री १०.३० वाजता ऐकुणी वेणूचा नाद हा ह.भ.प.श्रीमती गोदावरीताई मुंडे यांचा भजन संध्या कार्यक्रम होईल. शुक्रवार, दिनांक २४ एप्रिल रोजी रात्री १०.३० वाजता प्रसिद्ध गायक आसाराम जोशी, प्रा.रमेश सरवदे, सौ.मीनाताई सोमवंशी व अनंतराव जाधव यांचा अभंगवाणी हा विशेष संगीत कार्यक्रम होईल. शनिवार, दिनांक २५ एप्रिल रोजी रात्री १०.३० वाजता सामुहिक संगीत भजन होईल. यात सर्व गायनाचार्य व सर्व भजनी मंडळ सहभागी होतील. सप्ताहाची दैनंदिन रूपरेषा पुढीलप्रमाणे असेल पहाटे ४ ते ६ काकडा आरती, सकाळी ६ ते ७ विष्णु सहस्त्रनाम, सकाळी ७ ते १० वाजता ज्ञानेश्वरी पारायण, सकाळी १० ते दुपारी १२ वाजता गाथा भजन, दुपारी २ ते सायंकाळी ५ वाजता श्री तुकोबाराय चरित्र कथा, सायंकाळी ५.३० ते ६.३० वाजता हरिपाठ, रात्री ८.३० ते १०.३० वाजता किर्तन व नंतर हरिजागर होईल. या रौप्य महोत्सवी भव्य अखंड हरिनाम सप्ताहात रविवार, दिनांक १९ एप्रिल रोजी किर्तनकार ह.भ.प.चैतन्य महाराज देगलूरकर (पंढरपुर), सोमवार, दिनांक २० एप्रिल रोजी किर्तनकार ह.भ.प.केशव महाराज मुळीक (बारामती), मंगळवार, दिनांक २१ एप्रिल रोजी किर्तनकार ह.भ.प. विशाल महाराज खोले (मुक्ताई नगर), बुधवार, दिनांक २२ एप्रिल रोजी किर्तनकार ह.भ.प.वैभव महाराज राक्षे (भिमाशंकर), गुरूवार, दिनांक २३ एप्रिल रोजी किर्तनकार ह.भ.प.शिवाजी महाराज पहाणे (भिगवण), शुक्रवार, दिनांक २४ एप्रिल रोजी किर्तनकार ह.भ.प.जयंत महाराज गोस्वामी (त्रिंबकेश्वर), शनिवार, दिनांक २५ एप्रिल रोजी किर्तनकार ह.भ.प.समाधन महाराज रिंगणगावकर (जळगाव) हे आपली किर्तन सेवा देतील आणि रविवार, दिनांक २६ एप्रिल रोजी किर्तनकार ह.भ.प.अनिल महाराज पाटील (बार्शी) यांचे काल्याचे किर्तन होईल. व त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होईल. या सप्ताहासाठी अंबाजोगाई व केज तालुक्यातील भजनी मंडळे आपली सेवा देतील. रविवार, दिनांक २६ एप्रिल रोजी काल्याच्या दिवशी रात्री ९ ते ११ वाजता या वेळेत भारूड सम्राट ह.भ.प.सावता केशव फुले (सणसर, ता.इंदापूर, जि.पुणे) यांचा रंगीत संगीत, सोंगी भारूडाचा कार्यक्रम होईल. तरी पंचक्रोशितील सर्व भाविक भक्तांनी रौप्य महोत्सवी भव्य अखंड हरिनाम सप्ताह, श्री तुकोबाराय चरित्र कथा, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व भजन किर्तन सोहळ्याचा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन समस्त गावकरी मंडळी, मोरेवाडी यांच्या वतीने करण्यात येत आहे.

