भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सर्वपक्षीयांचे अभिवादन
१३ वर्षांपासून लोकजनशक्ती पार्टीच्या पुढाकाराने विविध उपक्रमांचे आयोजन – आयोजक राजेश वाहुळे यांची माहिती
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
शहरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जंतीनिमित्त यशवंतराव चौक येथे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सुरज तेरकर, आयोजक राजेश वाहुळे, मार्गदर्शक भिमराव सरवदे यांनी दिनांक १४ एप्रिल २०२६ रोजी विविध लोकोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन केले होते.

सर्वप्रथम सत्यशोधक अण्णा भाऊ साठे व्यापारी संकुल येथे झेंडावंदन करण्यात आले. त्यानंतर यशवंतराव चव्हाण चौक येथे डॉ.बाबासाहेबांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. तसेच भीमगीतांचा कार्यक्रम शाहीर व त्यांची टीम तसेच जयंतीला आलेल्या सर्वांसाठी भोजन देऊन जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी केज विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार पृथ्वीराज साठे, अंबाजोगाईचे माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, उपनगराध्यक्ष दिनेश भराडीया, भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक संजय गंभीरे, चंद्रशेखर वडमरे, शोभाताई सुनीलकाका लोमटे, भिमसेन लोमटे, नगरसेवक मालू जोगदंड, नगरसेवक ऍड.काकडे, नगरसेवक महेश कदम, नगरसेवक मुन्नाभाई पठाण, नगरसेवक महेश लोमटे, नगरसेवक मोहसीन भाई, नगरसेवक अकबर भाई, सामाजिक कार्यकर्ते जावेद गवळी, डॉ.अनिल मस्के, डॉ.साखरे, माजी नगरसेवक कमलाकर कोपले, संतोष मोहिते, शिवसेना नेते मदनलाल परदेशी, लोहिया, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष अमर देशमुख, ऍड.अरविंद मोटेगावकर, बापू केंद्रे, यशपाल बनसोडे, सचिन अंजान, राम जाधव, प्रशांत जगताप, ऍड.इस्माईल गवळी, सुगत सरवदे, हमीद चौधरी, महात्मा फुले वसतीगृह अधीक्षक बनसोडे, प्रकाश सरवदे, नामदेव मामा राठोड, माजी सरपंच भिसे, वाघमारे सर, अविनाश बेजगावकर, मंगेश जोगदंड, शैलेश गोस्वामी, प्रशांत भैया, मस्के, पत्रकार आरेफभाई, शेख फिरोज भाई, माजी नगरसेवक वाजेद खतीब, वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हाध्यक्ष शैलेश कांबळे, पीएसआय बाळासाहेब रोडे, निखिल पाडुळे, पप्पूभैया आपेट, तालमार्तंड प्रकाश बोरगावकर, कृष्णा सुनीलकाका लोमटे, लोकजनशक्ती पार्टीचे राजेश वाहुळे, प्रहार संघटनेचे जहांगीर मीर खान पठाण, शेख रमिज सर, जिल्हा परिषद सदस्य शंकरराव उबाळे, माजी सरपंच कचरे, भैय्या लोमटे, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष राणा चव्हाण, काँग्रेसचे नेते संजय वाघमारे, उमेश शिंदे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सुनील जगताप, डॉ.मस्के सर, शिवसंग्रामचे धनेश गोरे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते दीपक कांबळे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तालुकाध्यक्ष प्रमोद दासूद, जमील जहांगीरदार, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अभिजीत लोमटे, सरपंच बाळासाहेब केंद्रे, युवा नेते अमित जाजू, पत्रकार शेख जमीर भाई, सतीश क्षीरसगर, ऍड.कातखडे, सरपंच तथा संचालक बाजार समिती तानबा लांडगे, सामजिक कार्यकर्ते सुधाकर जोगदंड, लोकजनशक्ती पार्टीचे बीड जिल्हाध्यक्ष अशोक काळे, विशाल शेवाळे, प्रदीप गुंडरे, धम्मा वाघमारे, युवा नेते पंकज मस्के, धीमंत राष्ट्रपाल, रत्नदीप बनसोडे, पत्रकार शेख फिरोज, आदित्य चौरे, समितीचे अशोक बनसोडे, बालू, सचिन बनसोडे, मुळे, बंटी गायकवाड, सिद्धेश जाधव, जितेश जाधव, विलास कसबे जोतिर्लिंग जोगदंड, अक्षय पाटोळे, कैलास मस्के, अरूण धायगुडे आणि सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते व मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. लोकजनशक्ती पार्टीच्या वतीने मागील १३ वर्षांपासून पुढाकार घेऊन एक आगळावेगळा भिमजन्मोत्सव साजरा केला जातो. त्या अनुषंगाने यशवंतराव चव्हाण चौक अंबाजोगाई येथे विविध उपक्रम राबवून विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात येत आहे. यामध्ये १४ एप्रिल रोजी रात्री बारा वाजता झेंडावंदन, सकाळी महामानवांना अभिवादन, व्याख्यान, भिमगीतांची संगीत रजनी कार्यक्रम, मतिमंद शाळेतील मुलांना खाऊ वाटप, यशवंतराव चव्हाण चौक येथे खिचडी वाटप असे विविध दिशादर्शक उपक्रम राबविण्यात येतात हे विशेष होय.

