अंबाजोगाईत ३१ मार्च रोजी रिपाइं (ए) कार्यकर्ता मेळाव्यास बहुसंख्येने उपस्थित रहा – तालुकाध्यक्ष प्रमोद दासूद
अंबाजोगाई (प्रतिनिधी) बहुजन समाजातील उपेक्षित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व गायरान धारकांचे अंबाजोगाई तालुक्यातील सर्व लोकांचे प्रलंबित प्रकरणे मार्गी लावण्यासाठी, गायरान धारकांसह समाजातील विविध प्रश्नांची शासन दरबारी सोडवणूक करण्यासाठी रिपाइं (ए) युवा प्रदेशाध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष पप्पूजी कागदे यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवार, दिनांक ३१ मार्च २०२६ रोजी राघव फंक्शन हॉल, बस डेपो समोर, अंबाजोगाई येथे दुपारी साडेबारा वाजता भव्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे. तरी या मेळाव्यास बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन तालुकाध्यक्ष प्रमोद दासूद यांनी केले आहे.

या मेळाव्यास राजू जोगदंड, सचिनभाऊ कागदे, दीपक कांबळे (केज तालुकाध्यक्ष), दीपक कांबळे (अंबाजोगाई), राणीताई गायकवाड, दशरथ सोनवणे, राहुल गंडले, मधुकर कसबे, कोमल मस्के, करण साळवे, उमेश बचाटे, भाऊ कोरडे, राहुल जोगदंड, भाऊराव होके आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यात अंबाजोगाई तालुक्यातील गायरान धारकांना सरसकट सातबारा देण्यात यावा, गायरान जमिनीची नोंद वर्ग एक मध्ये घ्यावी, गायरान, गावठाण वस्ती मधील घरकुल धारकांना मालकी हक्काचा पीटीआर देण्यात यावा, प्रलंबित घरकुल मिळणेसंबंधी जलद कार्यवाही व्हावी, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये वाढ करून ती वेळेवर देण्यात यावी, यासह विविध मागण्यांची शासन दरबारी पूर्तता करण्यासाठी युवा रिपाइं (ए) प्रदेशाध्यक्ष पप्पूजी कागदे हे कार्यकर्त्यांशी चर्चा करून त्यांच्या उपस्थितीत अंबाजोगाई शहरात आयोजित रिपाइं कार्यकर्त्यांच्या भव्य मेळाव्यात मौलिक मार्गदर्शन करणार आहेत. तरी अंबाजोगाई तालुक्यातील रिपाइं (ए) चे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला, गायरान धारक, घरकुल धारक, विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन रिपाइं (ए) चे अंबाजोगाई तालुकाध्यक्ष प्रमोद दासूद यांनी केले आहे.

