मुंबई-क्रिकेट खास रिपोर्ट | लोकनामा ब्यूरो |
मुंबई-आयपीएल 2026 (IPL 2026) चा 19 वा सीजन आजपासून, 28 मार्च 2026 पासून सुरू होत असून, सलामीचा सामना गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाईल.हा सामना आज सांयकाळी 5:30 वाजता सूरू होणार आहे.

टाटा आयपीएल (TATA IPL 2026) ही जगातील सर्वात मोठी आणि श्रीमंत क्रिकेट लीग आहे. या लीगचा 19 वा हंगाम यंदा (IPL 2026) रंगणार आहे. या स्पर्धेची सुरुवात 28 मार्च 2026 रोजी बेंगळुरू येथील चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद (SRH) हा उद्घाटन सामना रंगणार आहे. 10 संघ आणि एकूण 74 सामने खेळवले जातील (70 साखळी सामने + 4 प्लेऑफ) खेळवले जणार आहेत. बीसीसीआय (BCCI) द्वारे संपूर्ण स्पर्धा भारतात आयोजित केली जात आहे.

