■ धानोरा खुर्द येथे ऑनलाइन शेती शाळा
अवजार बँक व हवामान अनुकूल तंत्रज्ञानाबाबत सविस्तर माहिती ■
अंबाजोगाई (प्रतिनिधी )-अशोक कोळी यांजकडून
अंबाजोगाई तालुक्यातील धानोरा खुर्द येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत ‘फार्मर कप’ राज्यस्तरीय वेबिनारचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

कृषी विभाग व पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या वेबिनारमध्ये राज्याचे कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे संचालक परिमल सिंह, कृषी विस्तार व प्रशिक्षण संचालक रफीक नाईकवाडी तसेच पाणी फाउंडेशनचे संस्थापक तथा सिने अभिनेते आमिर खान, मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित भटकळ यांनी मार्गदर्शन केले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष साळवे, उपविभागीय कृषी अधिकारी राहुल गायकवाड तसेच तालुका कृषी अधिकारी विजयकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला.
वेबिनार संपन्न झाल्यानंतर बैठकीत उपस्थित शेतकऱ्यांना नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प व्यवस्थापन कक्ष मुंबई व पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्त माध्यमातून आयोजित करण्यात येणाऱ्या ऑनलाइन शेती शाळांची सविस्तर माहिती देऊन त्याचे महत्त्व पटवून देण्यात आले. तसेच महिलांना बचत गटांच्या माध्यमातून अवजार बँक उभारणीसाठी अर्ज प्रक्रिया व आवश्यक कागदपत्रांची माहिती देण्यात आली. यासोबतच खरीप हंगामातील हवामान अनुकूल तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या सर्व बाबींविषयी सविस्तर माहिती तंत्रज्ञान समन्वयक शिवप्रसाद येळकर तसेच सहाय्यक कृषी अधिकारी पंडित काकडे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना दिली.
कार्यक्रमास उप कृषी अधिकारी भगीरथ माचवे, , सरपंच पार्वती महादेव पौळ, अंबिकाबाई सुरवसे, कृषिताई गीतांजली कासले, समूह सहाय्यक वाव्हळ तसेच गावातील अनेक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोकनामा न्यूज, अंबाजोगाई जि.बीड

