बळाचा वापर करणाऱ्या सुरक्षा रक्षकांवर कारवाई करण्याची इस्माईल गवळी यांची मागणी
अधिष्ठाता यांनी घटनास्थळ जाण्याचे का टाळले ?

अंबाजोगाई-ऑटोचालकास कोंडून मारहाण करताना सोडवण्यास गेलेल्या ॲड.इस्माईल गवळी यांनी सुरक्षा रक्षकांनी जबर मारहाण केल्याची घटना येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात घडल्याने एकच खळबळ उडाली असून या प्रकरणी बळाचा वापर करणाऱ्या संबंधित सुरक्षा रक्षकावर कारवाई करावी अशी मागणी वकिल इस्माईल गवळी यांनी केली आहे.

दरम्यान, या पाश्र्वभूमीवर अधिष्ठाता यांना माहिती मिळाली असताना सुध्दा त्यांनी घटनास्थळी येण्याचे का टाळले ? असा सवाल ही करण्यात येत आहे.दिवसेंदिवस स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात अनेक प्रकार होत असून यामुळे अंबाजोगाई ची बदनामी होवून सुध्दा सरकारकडून कसलीच कारवाई का होत नाही ?असा सवाल रुग्णांच्या नातेवाईक कडून होत आहे.
नुकतेच काही दिवसांपूर्वीच रूग्णालयात येणाऱ्या रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांचे पादञाणे पोत्यांमध्ये कोंबून इतरत्र घेवून जात असल्याच्या बातम्या प्रकाशित झाल्या होत्या.
*तणावाचे वातावरण*
वकिल गवळी यांना मारहाण झाल्याचे कळताच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे पदाधिकाऱ्यांसह समर्थकांची मोठी गर्दी झाली असून स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

*मारहाण कशामुळे झाली ?*
तैनात सुरक्षा रक्षकांनी संबंधित ऑटोचालकास कोणत्या कारणास्तव मारहाण केली आहे? यामध्ये वकिल इस्माईल गवळी यांच्यासह सुरक्षा रक्षक यांच्यात नेमका काय वाद झाला ? याची माहिती अद्याप मिळाली नाही.

*या घटनेवर अधिष्ठाता हे कशी भूमिका घेतात ? याकडे सर्वांचे लक्ष*
गेल्या अनेक महिन्यांपासून रुग्णालयात येणारया रुग्णांचे नातेवाईक असो वा पञकार,समाज सेवक,सामान्य नागरिक,वकिल यांना मारहाण करण्याचे प्रकार वारंवार होत आहेत.स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील सुरक्षा रक्षकांना दवाखान्याची सुरक्षा करण्यासाठी तैनात करण्यात आले आहे की,जनतेला मारहाण करण्यासाठी ? असा सवाल उपस्थित होत आहे.अधिष्ठाता यांनी आजच्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन काय व्यक्त होतात याकडे संपूर्ण अंबाजोगाई करांचे लक्ष लागले आहे.

