अहमदपूर – अहमदपूर येथील महात्मा गांधी महाविद्यालयातील इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. लक्ष्मण जोगदंड यांच्या महत्वपूर्ण संशोधन प्रकल्पास भारतीय सामाजिक विज्ञान अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांची मंजुरी मिळाली आहे.

प्रा. लक्ष्मण जोगदंड यांचे अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयात इंग्रजी विषयात एम.ए. शिक्षण पूर्ण झाले.
भाटुंबा (ता.केज) गावातील रहिवाशी असलेले व सध्या अहमदपूर येथील महात्मा गांधी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.

याचे सविस्तर वृत्त असे की, भारतीय सामाजिक विज्ञान अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांच्याकडून उच्च दर्जाचे संशोधनासाठी देशातील विविध विद्यापीठे व वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांना संशोधन प्रकल्पांसाठी अनुदान देण्यात येते,सदरील संशोधन प्रकल्पामध्ये महाविद्यालयातील इंग्रजी विषयाचे विभाग प्रमुख प्रा. लक्ष्मण जोगदंड यांनी भारतीय ज्ञानपरंपरा आणि मराठीतील प्रारंभीच्या वाङ्ममयीन परंपरांचा परस्परसंबंध अभ्यासणारा प्रमुख संशोधन प्रकल्पांतर्गत भारतीय जीवन, साहित्य आणि विचार या प्राधान्य क्षेत्राअंतर्गत विषयाला दिल्लीकडून मंजूर करण्यात आल्याचा संदेश महाविद्यालयास नुकताच प्राप्त झाला आहे.या संशोधन प्रकल्पात नाथ, महानुभाव आणि वारकरी या तीन प्रमुख संप्रदायांच्या परंपरांचा सखोल अभ्यास केला जाणार आहे.
प्रा.लक्ष्मण जोगदंड यांचे महाविद्यालयीन शिक्षण अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ कला महाविद्यालयात पूर्ण झाले आहे.
आहे. विशेषतः ‘विवेकसिंधू”, ‘गोरखाबाणी”, ‘लीळाचरित्र,सूत्रपाठ’ ,नामदेवांची अभंगरचना आणि ‘अमृतानुभव’ यांसारख्या महत्वपूर्ण ग्रंथांच्या आधारे भारतीय ज्ञानपरंपरेतील तत्त्वज्ञान, विचारप्रणाली आणि जीवनपद्धती यांचा सर्वांगीण अभ्यास करण्यात येणार आहे. दोन वर्षांमध्ये हे संशोधन पूर्ण करण्यात येणार असून, यामध्ये महाराष्ट्रसह मध्यप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये क्षेत्रीय अभ्यास केला जाणार आहे.

या प्रकल्पामुळे भारतीय ज्ञानपरंपरेच्या अभ्यासाला नवी दिशा मिळेल, तसेच मराठीच्या प्रारंभीच्या वाइ्मयाचा शैक्षणिक व सांस्कृतिक संदर्भात पुनमूल्यांकन होण्यास मदत होईल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.प्रा. लक्ष्मण जोगदंड यांच्या या निवडीबद्दल महाविद्यालयामध्ये संस्थेचे अध्यक्ष अँड किशनराव बंडकुळे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे सहसचिव शी. सुरेशराव देशमुख, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. पी. पवार हे उपस्थित होते. त्यांनी अभिनंदन करून पुढील कार्यासाठी प्रा. जोगदंड यांना शुभेच्छा दिल्या व संशोधन कार्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
तसेच महाविद्यालयीन मिञ शशीकांत बडे (शिक्षणाधिकारी ,कोल्हापूर) गणेश हट्टे (महसुल अधिकारी,संभाजीनगर ),बालाजी खैरमोडे (संपादक, लोकनामा अंबाजोगाई), सचिन धपाटे (शिक्षक),बालाजी सातभाई (वरिष्ठ लिपीक ,लातूर न्यायालय ),संजय फड (शिक्षक, परळी),बालाजी मसने (शिक्षक, अंबाजोगाई),अंगद होळंबे (मॅनेजर,कंपनी संभाजीनगर),अविनाश काका नांदूरे (शिक्षक),अमोल धोञे,गणेश बुरांडे सह आदींनी प्रा.लक्ष्मण जोगदंड यांचे अभिनंदन करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

