दादर रेल्वे स्थानकाचे नाव बदलुन डॉ बाबासाहेब आंबेडकर चैत्यभुमी असे नामकरण करण्यात यावे -लोक जनशक्ती पार्टी

बीड : महाराष्ट्रामध्ये बऱ्याच रेल्वे स्थानकाचे नाव बदलून थोर महापुरुषांचे नावे देण्यात आलेली आहेत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संपूर्ण देशाचे श्रद्धास्थान असून जसे अन्य रेल्वे स्टेशनला थोर महापुरुषांचे नावे देण्यात आली त्याच पार्श्वभूमीवर दादर रेल्वे स्टेशनला नाव बदलून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमी असे नामकरण करण्यात यावे अशी मागणी लोक जनशक्ती पार्टीच्या वतीने उपजिल्हाधिकारी अंबाजोगाई यांना करण्यात आली तसेच या मागणीसाठी संपूर्ण महाराष्ट्रात 17 मार्च 2026 रोजी प्रत्येक जिल्हाधिकारी व उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर लोक जनशक्ती पार्टीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येणार आहे याचे निवेदन देण्यात आले जर याची नोंद घेतली नाही तर दोन एप्रिल 2026 पासून सबंध महाराष्ट्रात व अंबाजोगाई येथे बेमुदत बंद पुकारण्यात येईल याची नोंद घेण्यात यावी यावेळी निवेदन देताना लोक जनशक्ती पार्टी युवा चे मराठवाडा प्रदेशाध्यक्ष राजेश वाहुळे ,बीड जिल्हा अध्यक्ष अशोक काळे ,विशाल शेवाळे, दयानंद कांबळे ,सय्यद अजहर ,फिरोज शेख ,कैलास मस्के आदी दिसत आहेत.

