
केज-(प्रतिनिधी) केज तालुक्यातील सतीश मुंडे या तरुणाची त्याच्याच मित्रांनी हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.कला केंद्रावरून परतत असताना जुन्या भांडणाच्या रागातून ही हत्या करण्यात आली.पोलिसांनी ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून परिसरात खळबळ उडाली आहे.
बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील साळेगाव येथील राहणारा आणि औषध विक्रेता असलेला एक तरुण मित्रांसोबत धाराशिव जिल्ह्यातील एका कला केंद्रावर गेला. कला केंद्रावर जाण्यापूर्वी रस्त्यात ते सर्वजण दारू प्यायले. त्यानंतर कला केंद्रावरून परत येत असताना मध्यरात्री त्याच्या छातीत आणि पोटात लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. त्यात त्याचा जीव गेल्यानंतर प्रेत त्याच गाडीतून घरी आणून टाकले असल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेने परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे. मयताचे नाव सतीश भागवतराव मुंडे (वय-37 वर्ष) असल्याचे कळते.मयत वडिलांच्या फिर्यादीवरून त्याच्या पाच मित्रांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.हि घटना 13 फेब्रुवारी 2026 रोजी घडल्याचे कळते.

