पञकारांचे प्रश्न सोडवणारे लढवय्या नेते म्हणजे एस.एम.देशमुख-ज्येष्ठ पञकार हेमंत देसाई*


कर्जत- महाराष्ट्रातील तमाम पञकारांचे प्रश्न सोडवणारे लढवय्या नेते म्हणजे एस.एम.देशमुख असे उदगार ज्येष्ठ पञकार हेमंत देसाई यांनी कर्जत येथील आदर्श पञकार संघ पुरस्कार सोहळयात बोलतांना व्यक्त केले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खा.श्रीरंग अप्पा बारणे (मावळ लोकसभा मतदारसंघ),आ.महेंद्र थोरवे (कर्जत खालापूर विधान सभा ),मंदार फणसे (संपादक न्यूज 18 मराठी),किरण नाईक (विश्वस्त, अ.भा.म.पञकार परिषद) ,माजी खासदार,रमेश ठाकूर,हेमंत देसाई (ज्येष्ठ पञकार, विचारवंत),मिलिंद अष्टीवकर (अध्यक्ष अ.भा.म. पञकार परिषद ),शिवराज काटकर (कार्याध्यक्ष, अ.भा.म.प.परिषद) यासह आदींची प्रमुख उपस्थिती होती.

